सोमवार, १५ जानेवारी, २०१८

के सिवन यांची इस्रोच्या चेअरमनपदी नियुक्ती - ११ जानेवारी २०१८

के सिवन यांची इस्रोच्या चेअरमनपदी नियुक्ती - ११ जानेवारी २०१८

* प्रसिद्ध शास्त्रज्ञ के सिवन यांची भारतीय अंतराळ संशोधन इस्रो चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षाचा असेल.

* ते ए एस कुमार यांची जागा घेतील २ जानेवारी २०१५ रोजी कुमार यांची इस्रोच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली होती.

* सिवन यांनी १९८० मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एअरोनॉटिकल इंजिनिअरींगची पदवी घेतली होती.

* त्यानंतर १९८२ साली त्यांनी बंगळुरूमधील आयआयएस्सीमधून एअरोस्पेस इंजिनिअरिंग पदवी घेतली होती. २००६ साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून त्यांनी एअरोरस्पेस इंजिनिअरिंग मध्ये पीएचडी पूर्ण केली होती.

* सिवन यांनी १९८२ साली इस्रोमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी पीएसएलव्ही प्रकल्पावर काम केलेले आहे. तसेच त्यांनी एंड टू एंड मिशन प्लॅनींग, मिशन डिझाईन, मिशन इंटिग्रेशन आणि अनॅलिस यामध्ये विपुल योगदान दिले आहे.

* सिवन हे सध्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये निर्देशक म्हणून काम पाहत आहेत. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.