शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - जानेवारी २०१८

काही नवीन चालू घडामोडी - जानेवारी २०१८

* केंद्र शासनाच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम २०१६ च्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा सरासरी वार्षिक बालमृत्यू दर २४ वरून २१ वर आला असून मागील वर्षापेक्षा ३ अंकांनी घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

* १८ ते २० जानेवारी २०१८ दरम्यान जर्मनीच्या बर्लिनमध्ये १० व्या 'वैश्विक अन्न व कृषी मंच' ची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

* आफ्रिकेच्या लेसोथो देशात एक असा हिरा सापडला आहे, जो जगात या गुणवत्ता पाचवा सर्वात मोठा हिरा आहे. जेम डायमंड या कंपनीने हा हिरा शोधला.

* राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण [NFHS-४] च्या निष्कर्षनुसार, संपूर्ण भारतात दिल्ली आणि पंजाबमधील लोक सर्वात श्रीमंत आहेत आणि शीर्ष संपत्तीसंदर्भाच्या पाच गटात या प्रदेशात ६०% हुन अधिक श्रीमंत कुटुंब वास्तव्य करतात.

* दिल्ली आणि पंजाबमध्ये सुमारे ६०% कुटुंब अग्रगण्य श्रीमंतांच्या शीर्ष गटात आहेत. त्यानंतर गोव्याचा [५४.५%] क्रमांक लागतो.

* सध्या चलनात असलेले १४ प्रकारचे दहा रुपयाचे चलन वैधच आहे. हे सर्व चलन भारतीय रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणले गेल्याने ते यापुढेही वैधच राहणार असे आरबीआय यांनी सांगितले.

* युनायटेड किंग्डम च्या प्रधानमंत्री यांनी आपल्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच सामाजिक एकटेपण घालवण्यासाठी [एकटेपण मंत्री] याची नियुक्ती केली आहे. असा प्रयोग जगात सर्वप्रथम येथे करण्यात आला.

* भारताच्या 'कार्टोसॅट' उपग्रहाने पहिल्यांदाच इंदोर शहराचे उपग्रह चित्र प्रसारित करण्यात आले आहेत. आता लवकरच भारताचे उपग्रह गुगल मॅप्स सारखे चित्र प्रसारित होणार आहेत.

* राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ४८ किलो गटात मणिपूरच्या सरजुबाला देवी हिने सुवर्णपदक जिंकले. त्यांनी पहिले विश्व कास्य पदक जिंकले आहे.

* भारताचे पूर्व कर्णधार दिलीप वेंगसकर यांनी भारताच्या प्रमुख फलंदाज असणारे संजय मांजरेकर यांच्या 'इम्परफेक्ट' या आत्मकथेचे उदघाटन केले.

* भारताची डिजिटल बँक पेटीएमने पेटीएम मनी लिमिटेड ही नवी वित्तीय संस्था सादर केली असून ही संस्था आता ग्राहकांना गुंतवणूक आणि कर्ज यासाठी मदत करेल. पेटीएम मॉल, पेटीएम पेमेंट्स बँक, पेटीएम वॉलेट आता पेटीएम मनी अशा चार सेवा उपलब्द करून दिले. पेटीएम चे संस्थापक विजय शेखर शर्मा आहेत.

* सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता भारतातील चित्रपटगृहात राष्ट्रगीत चालवणे अनिवार्य नाही. असा जाहीर निर्णय घेण्यात आला आहे.

* टर्कीमध्ये चालू असलेल्या एका आंतरराष्ट्रीय स्कियिंग मध्ये भारताच्या २१ वर्षीय आचल ठाकूरने पहिल्यांदा कांस्यपदक जिंकून इतिहास रचला.

* भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त विकसित अशा प्रत्युष सुपर कॉम्पुटरचे उदघाटन करण्यात आले आहे. 'प्रत्युष' जगातील चौथ्या क्रमांकाचा जास्त गतिमान कॉम्प्युटर आहे.

* अंधाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तेलंगणा सरकारने हैद्राबादमध्ये विशेष राष्ट्रीय पार्कचे उदघाटन तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केले. या पार्कमध्ये अंधांसाठी विशेष सुविधायुक्त हे देशातील पहिलेच पार्क आहे.

* १८ जानेवारी रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या २५ व्या बैठकीत ५३ सेवांच्या दरात कपात करण्यात आली असून, हस्तकलेसह २९ वस्तूवर आता शून्य टक्के कर लावला जाईल.

* आयएनएसव्ही तारिणी या बोटीतून समुद्रमार्गाने जगाची परिक्रमा करत असलेल्या भारतीय नौदलातील महिला केपहॉर्नला पोहोचल्या आहेत. ही एक शिडाची नौका सेल बोट खोल समुद्रात दूरवर जाऊ शकते.

*


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.