शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

स्मार्ट सिटी योजनेसाठी ९ शहराची घोषणा - २० जानेवारी २०१८

स्मार्ट सिटी योजनेसाठी ९ शहराची घोषणा - २० जानेवारी २०१८

* स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत आतापर्यंत देशातील ९० शहरांची घोषणा करण्यात आली असून त्यात शुक्रवारी आणखी ९ शहरांची निवड करण्यात आली.

* केंद्रीय आवास एवं शहरी कार्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या शहरांची घोषणा केली ते पुढीलप्रमाणे सिल्व्हासा - दादरा नगर हवेली, सहारनपूर - उत्तर प्रदेश, मुरादाबाद - उत्तर प्रदेश, बरेली - उत्तर प्रदेश, बिहार शरीफ - बिहार, कवरत्ती - लक्षद्वीप, दीव - दीव दमण, एरोडे - तामिळनाडू, इटानगर - अरुणाचल प्रदेश.

* अशा वरील ९ शहराची घोषणा करण्यात आली असून एका शहराची घोषणा काही दिवसात होणार असून आतापर्यंत ९९ शहरांची स्मार्ट सिटी साठी यादी तयार असून लवकरच एका शहराची घोषणा करून १०० स्मार्ट शहराची यादी तयार केली जाईल.

* या योजनेअंतर्गत ज्या ९९ शहरांची यादी घोषित करण्यात आले त्या शहरात टप्प्याटप्प्याने एकूण २ लाख तीन हजार एवढी गुंतवणूक होणार असून त्याच्या आधारे या सर्व शहरात विकास केला जाईल.

* आतापर्यंत जवळपास ३५ हजार कोटी रुपयाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पातील शहरात जोमाने सुरु आहे. तसेच एकूण ३,००० प्रकल्पावर काम वेगाने सुरु असून ते लवकरच पूर्ण होतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.