मंगळवार, २ जानेवारी, २०१८

नासाचा पार्कर सोलार प्रोबचे अवकाशयान उड्डाण - २ डिसेंबर २०१७

नासाचा पार्कर सोलार प्रोबचे अवकाशयान उड्डाण - २ डिसेंबर २०१७

* अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा' अनेक महत्वाकांक्षी मोहीमा राबविणार असून, त्यात सूर्याला स्पर्श' करण्याच्याही मोहिमेचा समावेश आहे. नासाला २०१८ मध्ये ६० वर्षे पूर्ण होत आहेत.

* नासाचा पार्कर सोलर प्रोब हे अवकाशयान या वर्षात अवकाशात उड्डाण करणार आहे. सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडले जाणार आहे.

* आपल्या ७ वर्षाच्या नियोजित प्रवासात हे यान शुक्राच्या गुरुत्वाकर्षणचा वापर करून सूर्याच्या अधिकाधिक जवळ जाणार आहे.

* ते यान बुधाच्या कक्षेतच असेल. यानाने हे अंतर गाठल्यास ते सूर्याच्या आतापर्यंत सर्वात जवळ गेलेले यान ठरेल. सूर्याच्या अत्यंत उष्ण आणि सौर लहरींमुळे धोकादायक मानल्या गेलेल्या भागाचा अभ्यास करण्याचा [पार्कर प्रोब]चा मुख्य उद्देश होता.

* तसेच सूर्याच्या प्रभेतून ऊर्जा आणि उष्णतेचे वहन कसे होते. सौरवादळे कशी निर्माण होतात, सौरउर्जेने भारित कण कसे निर्माण होतात. अशा प्रश्नांच्या उत्तरांचाही शोध घेण्याचा प्रयत्न हे यान करणार आहे.

* २०१८ या वर्षात नासा ने आणखी एक मंगळ मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. नासा चे इनसाईट मार्स लॅण्डर हे यान या वर्षात मंगळाच्या दिशेने उड्डाण करणार असून ते या ग्रहाच्या पृष्ठभागाबरोबर अंतर्भागाचाही अभ्यास करणार आहे.

* याशिवाय आपल्या सौरमालेबाहेरील किमान दोन लाख तेजस्वी ताऱ्यांचे निरीक्षण करून नव्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी जून महिन्यात टेस हे यान नासा सोडणार आहे.

* सौरमालिकेतील किमान उड्डाणाबरोबरच [आईस-सॅट २] आणि ग्रेस फॉलोऑन या दोन मोहिमेला नासा राबविणार आहे. पृथ्वीवरील हिमनगांचा समुद्रपातळीचा आणि भूजलपातळीचा अभ्यास याद्वारे केला जाणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.