शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार - १९ जानेवारी २०१८

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार - १९ जानेवारी २०१८

* प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची घोषणा केली. यंदा देशभरातील १८ बालकांना हा पुरस्कार मिळाला आहे.

* महाराष्ट्राच्या १७ वर्षीय नदाफ एजाज अब्दुल रौफचाही बालशौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. नदाफ हा नांदेडच्या पार्डी गावचा आहे.

* त्याने ३० एप्रिल २०१७ रोजी तालावात बुडणाऱ्या दोन मुलीचा जीव वाचवला होता. या कामगिरीसाठी त्याचा राष्ट्रीय शौर्यपुरस्कार जाहीर झाला आहे.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बालकांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या वीर बालकांचा चमू प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे.

* १९५७ पासून या बाल शौर्य पुरस्काराची सुरुवात झाली होती. पहिला बाल शौर्य पुरस्कार हरीश चंद्र मेहराला मिळाला आहे.

* दिल्लीच्या रामलीला मैदानात तत्कालीन पंतप्रधान नेहरूजी यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम सुरु केला. त्यावेळी अचानक तंबूत आग लागली. पण हरीश चंद्र मेहरा नावाच्या बालकाने जे प्रसंगावधान दाखवलं त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.

* तेव्हापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या हस्ते अशा वीर बालकांचा सन्मान केला जातो. या पुरस्कारांमध्ये पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम याचा समावेश आहे.

* शिवाय पुरस्कार प्राप्त बालकांच्या पुढील शिक्षणाचा खर्च इंडियन कौन्सिल फॉर चाईल्ड अँड वेलफेअर या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत केला जातो.

* बाल शौर्य विजेती मुले - नाझिया उत्तरप्रदेश, दिवंगत नेत्रावती एम चव्हाण कर्नाटक, करणबीर सिंह पंजाब, बेतश्वजॉन पिनलँग मेघालय, ममता दलाई उदीशा, सब्यास्टियन विन्सेट केरळ, लक्ष्मी यादव छत्तीसगढ, मनशा एन नागालँड, एन शांगपोन कोयांक नागालँड, योऍक्ने नागालँड, चिंगई वांगसा नागालँड, समृद्धी सुशील शर्मा गुजरात, झोनन्टलॉंगा मिझोराम, पंकज सेमवाल उत्तराखंड, नदाफ एजाज अब्दुल रौफ महाराष्ट्र, दिवंगत लोकपाप राजेश्वर चानू मणिपूर, पंकज कुमार महंता उडिशा. 


















0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.