गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

भारताने अग्नी ५ क्षेपणास्त्रची चाचणी केली - १८ जानेवारी २०१८

भारताने अग्नी ५ क्षेपणास्त्रची चाचणी केली - १८ जानेवारी २०१८

* भारताने आज सर्वात दूरच लक्ष्य भेदणाऱ्या अग्नी ५ या क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी केली. ओडिशातील अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली.

* अग्नी ५ मिसाईल क्षमता तब्बल ५ हजार किमीपेक्षा जास्त आहे. महत्वाच म्हणजे अणुबॉम्ब किंवा तत्सम हत्यारांनी वाहनक्षमता या मिसाईलमध्ये आहे.

* जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या अग्नी ५ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी २०१२ मध्ये झाली होती. आता क्षेपणास्त्रचा भारताच्या युद्धताफ्यात समावेश होणार आहे.

* अग्नी ५ च्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताच्या वैज्ञानिकांच अभिनंदन केलं. भारताने यापूर्वी अग्नी १,२,३ या क्षेपणास्त्राचा युद्धताफ्यात समावेश केला आहे.

* ही तीनही क्षेपणास्त्र पाकिस्तानचा धोका ओळखून आणली आहेत. तर अग्नी ५ हे चीनचा सामना करण्यासाठी असल्याच सांगण्यात येत आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.