रविवार, १४ जानेवारी, २०१८

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष - ८ जानेवारी २०१८

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष - ८ जानेवारी २०१८

* ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात इटलीतील मिलान कोर्टाने सर्व आरोपीना पुराव्याअभावी निर्दोष ठरविले आहे.

* ऑगस्टा वेस्टलँड आणि फिंमेकॅनिका कंपनीचे माजी प्रमुख गिसेपी ओरसी, बिचोलिए क्रिशियन मिशेल, ऑगस्टावेस्टलँडचे माजी उच्चाधिकारी गियुसेपे ओरसी आणि ब्रुनोस्पेगनोलिनी यांचा आरोपीमध्ये समावेश होता.

* या व्यवहारात फिनमेकनिका कंपनीचे माजी प्रमुख गिसेपी ओरसी यांच्यावर लाच दिल्याचा आरोप लावण्यात आला होता.

* या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर करारामध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचे सिद्ध व्हावे यासाठी लागणारे ठोस असे पुरावे नाहीत, असे कोर्टाने सांगितले.

* या व्यवहारामुळे भारताला नुकसान झाल्याचेही इटलीच्या कोर्टाले फेटाळले आहे. मात्र दुसरीकडे या करारामुळे नुकसान झाल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला होता.

* याप्रकरणी भारतातही खटला सुरु आहे. परंतु मिलान कोर्टाच्या या निर्णयामुळे सीबीआयचा खटला कमकुवत होण्याची शक्यता आहे.

* याप्रकरणी सीबीआयची माजी वायुसेना प्रमुख एसपी त्यागी यांच्यासहित अनेक आरोपीविरोधात चौकशी सुरु आहे. याप्रकरणी २ जी घोटाळानंतर ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणातही कोर्टाने ठोस पुरावे लसल्याचे म्हटले आहे. हे दोन्ही घोटाळे युपीए सरकारच्या काळात झाले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.