मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

भारत-इस्त्राईल दरम्यान ९ करार - १६ जानेवारी २०१८

भारत-इस्त्राईल दरम्यान ९ करार - १६ जानेवारी २०१८

* कृषी, जलव्यवस्थापन, संरक्षण साधनसामुग्री, विज्ञान तंत्रज्ञान संशोधन या परंपरागत सहकार्याबरोबर सायबर सुरक्षा तेल व नसर्गिक वायू यासारख्या नव्या क्षेत्रातही परस्पर सहकार्याच्या कक्षा रुंदावणार व भारत व इस्त्राईल दरम्यान आज एकमत होणार.

* परंपरागत सहकार्याच्या क्षेत्रात सायबर सुरक्षा आणि तेल व नैसर्गिक वायूच्या क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

* पुढील प्रमुख कराराची क्षेत्रे - सायबर सुरक्षा, तेल व नैसर्गिक वायू व ऊर्जा, सहचित्रपट निर्मिती, हवाई वाहतूक, होमिओपॅथी औषध संशोधन, अंतराळविषयक सहकार्य, भारत व इस्त्राईलमधील गुंतवणूक मेटल एअर बॅटरी, सौर औष्णिक तंत्रज्ञान.

* भारत व इस्त्राईल दरम्यान कृषी आणि जलव्यवस्थापन क्षेत्रात काही अत्याधुनिक सहकार्याचा या भेटीत चर्चा झाली. विशेषतः पाण्याच्या शुद्धीकरणाच्या क्षेत्राचा त्यात समावेश आहे.

* त्याचबरोबर शेतीमध्ये कमी साधनसामुग्रीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याबाबतचे तंत्रज्ञानही देण्याची तयारी इस्त्राईलने केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.