सोमवार, १५ जानेवारी, २०१८

७५ वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा - ९ जानेवारी २०१८

७५ वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा - ९ जानेवारी २०१८

* ७ जानेवारी रोजी पार पडलेल्या ७५ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात अझीझ अन्सारी यांच्या रूपाने प्रथमच आशियाई कलाकाराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

* 'मास्टर ऑफ नन' या टीव्ही मालिकेतील अभियानासाठी अझीझ यास सर्वोत्कृष्ट विनोदी अभियानासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

* अन्सारी हा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारा यंदाचा एकमेव आशियाई कलाकार ठरला आहे. अन्सारी भारतीय वंशाचा कलाकार ठरला आहे.

* अन्सारी भारतीय वंशाचा कलाकार आहे. तो मूळचा तामिळनाडूमधील आहे. मात्र त्याचा जन्म आणि शिक्षण अमेरिकेत झाले आहे. या पुरस्कार सोहळ्यावर निर्माता हार्वे वाईनस्टीन याने केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणाचे पडसाद उमटले.

* किमान ७० अभिनेत्रीचा वाईनस्टीनने छळ केल्याचे आजवर उघड झाले आहे. त्याचा निषेध म्हणून या कार्यक्रमात काळ्या रंगाचा पेहराव करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

* त्यानुसार निषेधाचा हा सूर पेहराव आणि भाषणातून व्यक्त झाला. या सोहळ्यात विजेत्यांची, लैंगिक छळ आणि मानधनातील स्त्री-पुरुष भेदभाव या मुद्यावरील भाषणे महत्वाची ठरली.

* हॉलिवूड फॉरेन प्रेस असोशिएशनच्या वतीने दिला जाणारा 'सेसिल बी डिमाइल्स हा प्रतिष्ठेचा पुरस्कार या सोहळ्यात विन्फ्रे ओप्रा यांनी स्वीकारला. अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच कृष्णवर्णीय ठरल्या आहेत.

* थ्री बिलबोर्डस आउटसाईड एबिंग, मिसूरी या चित्रपटातील भूमिकेसाठी फ्रान्सेस मॅकड्रोमंड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पुरस्कार मिळाला.

* गॅरी ओल्डमॅन यांना द डार्कस्ट अवरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर निकोल किडमनला बिग लिटिल लाईज या टीव्हीफिल्मसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

* अभिनेत्रीचा एलिझाबेथ मॉसला 'द हँडमेड्स टेल मधील भूमिकेसाठी दूरचित्रवाणीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.