रविवार, १४ जानेवारी, २०१८

लालूप्रसाद यादव याला साडेतीन वर्षाची शिक्षा - ७ जानेवारी २०१८

लालूप्रसाद यादव याला साडेतीन वर्षाची शिक्षा - ७ जानेवारी २०१८

* राजद राष्ट्रीय जनता दल यांचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना रांची सीबीआय कोर्टाने चारा घोटाळाप्रकरणी साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 

* तसेच त्यांना ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून त्यांना जामीन मिळणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

* ३० डिसेंबरला झालेल्या सुनावणीत त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. सुमारे २१ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. 

* निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच ६९ वर्षीय लालूप्रसाद यांना अटक करण्यात आली होती. यानंतर लालूंच्या शिक्षेची सुनावणी तीनवेळा टळली होती. 

* ३० डिसेंबरला झालेल्या सुनावणीत, १९९० नंतर लालू प्रसाद यांनी संपादित केलेल्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते.

* तसेच माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह सहा आरोपीना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले गेले होते.

* चारा वितरणाच्या नावाखाली महसूल विभागाच्या देवघर कोशागारातून १९९१ ते १९९४ या वर्षात ८९ लाख २७ हजार रुपयांचा हा गैरव्यवहार झाला होता.

* पाटणा उच्च न्यायालयाने १९९६ मध्ये या घोटाळ्याच्या तपासाचे आदेश दिले होते. लालूप्रसाद यांच्यावर चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी तीन प्रकरणे दाखल आहेत.

* त्यात दुमका कोषागारातून ३.९७ कोटी, चैबासा कोषागारातून ३६ कोटी आणि दोरांदा कोषागारातून १८४ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.