मंगळवार, २ जानेवारी, २०१८

भारताच्या परराष्ट्र सचिवपदी विजय गोखले यांची नियुक्ती - २ डिसेंबर २०१८

भारताच्या परराष्ट्र सचिवपदी विजय गोखले यांची नियुक्ती - २ डिसेंबर २०१८

* चीनमधील माजी राजदूत व सध्या परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक संबंधाविषयक विभागाची जबाबदारी सांभाळणारे सचिव विजय केशव गोखले यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून आज नियुक्ती करण्यात आली.

* त्यांना दोन वर्षाची मुदत मिळणार आहे. वर्तमान परराष्ट्र सचिव एस जयशंकर हे २८ जानेवारी रोजी निवृत्त होतील. गोखले हे चीन तसेच पूर्व आशियाशी निगडित तज्ञ मानले जातात.

* १९८१ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झालेले गोखले हे जयशंकर यांच्या खालोखाल सेवाज्येष्ठता आहेत. २०१३ ते २०१६ या काळात त्यांनी जर्मनीत राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

* त्यानंतर जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या काळात त्यांची चीनमधील भारतीय राजदूत म्हणून नेमणूक होती. ऑक्टोबर २०१७ नंतर ते दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयातच आर्थिक संबंधविषयक सचिव म्हणून काम पाहत होते.

* गोखले यांनी जानेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१३ या काळात मलेशियात भारतीय उच्चायुक्त म्हणून काम पाहिले. त्यापूर्वी त्यांनी हॉंगकाँग, हनोई, बीजिंग, तैपेई, न्यूयॉर्क याठिकाणी विविध राजनैतिक जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.

* गोखले यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात एम ए ची पदवी प्राप्त केली आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.