बुधवार, १७ जानेवारी, २०१८

पतंजलीची उत्पादने आता ऑनलाईन मिळणार - १७ जानेवारी २०१८

पतंजलीची उत्पादने आता ऑनलाईन मिळणार - १७ जानेवारी २०१८

* वार्षिक ५० हजार कोटीच्या उत्पादनक्षमतेचा पल्ला गाठणाऱ्या पतंजली उद्योगसमूहाची उत्पादने आता घरबसल्या ऑनलाईन मिळू शकणार आहेत. अशी अधिकृत घोषणा बाबा रामदेव यांनी केली.

* पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण या वेळी उपस्थित होते. हरिद्वार से हर द्वार तक या कॅचलाईन सह पतंजलीने ईकॉमर्स क्षेत्रात उडी घेतली आहे.

* ऑनलाईन सेवेद्वारे दररोज १० लाख ग्राहकापर्यंत पोचण्याचा उद्देश असल्याचे रामदेव यांनी सांगितले. पतंजलीच्या उत्पादनावर कोणताही ऑनलाईन सूट न देता ती आहे त्याच किमतीला विकण्याचे वचन या साऱ्यांनी दिल्याचे रामदेव बाबा म्हणाले.

* आम्ही आगामी दोन वर्षात एक लाख कोटी रुपयाचे उत्पादन लक्ष्य आम्ही निश्चितपणे गाठू व संपूर्ण देशात भारतीय आयुर्वेदाचा व उत्पादनाचा गौरव वाढवू शकतो.

* या कार्यक्रमाला पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा, पेटीम मॉलचे सीईओ अमित सिन्हा, बिग बास्केटचे संस्थापक हरी मेनन, फिलपकार्टचे अध्यक्ष कल्याण कृष्णमूर्ती, ग्रोफोर्स  चे संस्थापक सौरभ कुमार, अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी, नेटमेड चे प्रदीप दाढा. हे उपस्थित होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.