सोमवार, १ जानेवारी, २०१८

सकारात्मक शांतता निर्देशांकामध्ये भारत जगात ९० व्या स्थानावर - १ जानेवारी २०१८

सकारात्मक शांतता निर्देशांकामध्ये भारत जगात ९० व्या स्थानावर - १ जानेवारी २०१८

* जगात अशांतता, राजकीय अस्थैर्य असताना सकारात्मक बातमी आली आहे. मागील एका वर्षांपासून अनेक देशात संघर्ष सुरु आहे. पण तरीही जगातील १६३ देशांपैकी ९३ देशामध्ये शांततेचे वातावरण निर्माण झाले.

* यात भारत ९० व्या स्थानावर आहे. 'इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस' संघटनेने त्यांच्या अहवालात विविध देशातील २००५ ते २०१६ दरम्यान व्यवसाय, राजकारण, पर्यावरण आदी निकषावर शांततेचे स्तर निश्चित केले आहेत.

* निर्देशांकानुसार ६३ देशात शांततेचे वातावरण कमी झाले. याशिवाय प्रत्येक देशात शांततेचा स्तर ०.२८% वाढला. आइसलँड सर्वात शांत देश आहे. तर सिरिया सर्वात अशांत देश आहे.

* जगातील पॉझिटिव्ह टॉप पाच देश पुढीलप्रमाणे स्वीडन, स्वित्झर्लंड, फिनलँड, नॉर्वे, डेन्मार्क आहे.

* सकारात्मक शांतता निर्देशांकात ८ निकषावर रँकिंग दिली जाते. यात व्यवसायिक वातावरण, माहिती देणे, मानव संपदा, संसाधने, दुसऱ्यांच्या अधिकाराप्रती सन्मान, स्थिर सरकार आणि भ्रष्ट्राचार यांचा समावेश आहे.

* त्यांना २४ भागात वितरित केले गेले आहे. यात प्रामुख्याने लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य, जीडीपी, कायदा व सुव्यवस्था, माध्यमांचे स्वतंत्र आदी निकष सामील आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.