बुधवार, १७ जानेवारी, २०१८

राज्य मंत्रिमंडळाचे काही महत्वाचे निर्णय - १७ जानेवारी २०१८

राज्य मंत्रिमंडळाचे काही महत्वाचे निर्णय - १७ जानेवारी २०१८

* महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी - २०१७ ला मान्यता.
* मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी मेकोरोट या इस्त्राईल सरकारच्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास मान्यता.
* अनाथ मुलांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी १% समांतर आरक्षण ठेवण्याचा निर्णय.
* कोल्हापूर विमानतळाचे नामकरण 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ,कोल्हापूर' करण्याचा निर्णय.
* ग्रामपंचायतीना स्वतःच्या कार्यालयासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरु करण्यास मानस.
* डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर(मिहान) चे उन्नतीकरण, आधुनिकीकरण, देखभाल संचालन आदी कामे पीपीपी तसेच डीबीटीओटी तत्वावर करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यास मान्यता.
* सरपंचाच्या थेट निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या काही काही कलमामध्ये सुधारणा.
* सिडको महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पासाठी साडे बावीस टक्के विकसित भूखंडाची योजना मंजूर.
* भूसंपादन अधिनियम २०१३ मध्ये सुधारणा सार्वजनिक कामासाठी गावातील जमिनीला बाजारभावाच्या चारपट मोबदला मिळणार.
* महामंडळाच्या सदस्य संख्या वाढीसाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम २००० मध्ये सुधारणा.
* नागरी जमीन कमाल धारणा कलमानुसार औद्योगिक प्रयोजनासाठी सवलत देण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतर शुल्काच्या आकारणीबाबत निर्णय.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.