सोमवार, १ जानेवारी, २०१८

रिलायन्स कम्युनिकेशनची मुकेश अंबानींकडून खरेदी - १ जानेवारी २०१७

रिलायन्स कम्युनिकेशनची मुकेश अंबानींकडून खरेदी - १ जानेवारी २०१७

* गळ्यापर्यंत आलेल्या प्रचंड कर्जाच्या फासातून अनिल अंबानी यांना अखेर थोरल्या भावानेच तारले आहे. अनिल अंबानी यांच्याकडील दूरसंचार मनोरे तसेच ऑप्टिकल फायबर व्यवसाय मुकेश अंबानी यांनी खरेदी केला आहे. 

* अनिल अंबानी यांच्याकडील रिलायन्स कम्युनिकेशन अंतर्गत असलेले ४३,००० दूरसंचार मनोरे, ४ जी सेवा तसेच ऑप्टिकल फायबर व्यवसाय जियोने खरेदी करण्याबाबतचा करार गुरुवारी मुंबईत झाला. 

* या माध्यमातून अनिल अंबानी यांनी या क्षेत्रातील त्यांच्याकडील अखेरच्या व्यवसायातूनही अंग काढून घेतले आहे. आरकॉमने मार्च २०१७ अखेर १,२८५ कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे. 

* रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेडबरोबरचा नवा व्यवहार येत्या तिमाहीत पूर्ण होते अपेक्षित आहे. सुरवातीच्या कालावधीत इन्फोकॉम नावाने दूरसंचार व्यवसाय एकत्रित रिलायन्स समूहाकडे होता. 

* मात्र २००० च्या दशकप्रारंभीच व्यवसायाकरीता विलग झालेल्या अंबानी बंधुपैकी अनिल अंबानी यांच्याकडे दूरसंचार व्यवसाय आला होता. यानंतर २०१६ च्या अखेरीस मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जियोमार्फत या व्यवसायात पुनप्रवेश केला. 

* वर्षभराच्या रिलायन्स जियोच्या दूरसंचार व्यवसाय पदार्पणाने अन्य स्पर्धक दूरसंचार कंपन्यांबरोबर रिलायन्स कम्युनिकेशनचा आर्थिक पाय खोलात गेला होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.