सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात नवीन ९०० विमाने दाखल होणार - २६ डिसेंबर २०१७

भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात नवीन ९०० विमाने दाखल होणार - २६ डिसेंबर २०१७

* भारतात येत्या काही वर्षात विमान वाहतूक सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार असून, देशात कार्यरत विमान वाहतूक कंपन्यांकडून आगामी काळात ९०० विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. अशी माहिती केंद्रीय विमान मंत्रालयाने दिली आहे.

* भारत हा जगात वेगाने विकसित होत असलेल्या एव्हिएशन मार्केटपैकी एक असून नागरी विमान वाहतूक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांनी आता आपले लक्ष्य प्रादेशिक भागावर केंद्रित केले आहे.

* सध्या विमान कंपन्याजवळील विमान संख्या अनुक्रमे - एअर इंडिया १५५ विमाने, इंडीगो १५० विमाने, जेट एअरवेज १०७ विमाने, स्पाईस जेट ५७ विमाने, गो एअर ३४ विमाने, एअर एशिया १४ विमाने, विस्तारा १७ विमाने, टूजेट ४ विमाने, एवढी विमाने सध्या प्रत्येक कंपन्या जवळ आहेत.

* इंडिगो कंपनीकडूनच येत्या ५ ते ७ वर्षात ४४८ विमाने खरेदी करण्यात येइल असे सांगण्यात येत आहे. एअर एशिया इंडियाकडून येत्या ५ वर्षात ६० विमाने, अशा सर्व कंपन्याकडून येत्या ५ ते १० वर्षात जवळपास ९०० विमाने खरेदी करण्यात येतील.

* आपली सेवा कानाकोपऱ्यात विस्तारण्यासाठी सर्व कंपन्या प्रयत्नशील असून विमान प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांनी आपला व्यवसाय वाढवन्यासाठी विमाने खरेदी करण्यात येणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.