रविवार, ३ डिसेंबर, २०१७

गौरी गाडगीळ हिला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर - ३ डिसेंबर २०१७

गौरी गाडगीळ हिला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर - ३ डिसेंबर २०१७

* जागतिक अपंग दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारासाठी यल्लो चित्रपट फेम गौरी गाडगिलची निवड करण्यात आली आहे.

* राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारांमध्ये यंदा महाराष्ट्रातील ५ दिव्यांगांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या पुरस्काराचे वितरण ३ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

* प्रतिवर्षी सामाजिक व न्याय विभागांतर्गत हे पुरस्कार दिले जातात. दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था उत्कृष्ट कर्मचारी, दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या संशोधन संस्था अशा श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात.

* मुंबईतील प्रणय बुराडे आणि पुण्यातील गौरी गाडगीळ या दोघांना मानसिक दुर्बलता व मानसिक स्थूलता देण्यात आला आहे.

* पुण्यातील गौरी गाडगीळ ही डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे. गौरीने या परिस्थितीशी दोन हात करत स्विमिंगमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

* उत्कृष्ट संस्थेसाठी वाशी नवी मुंबई येथील ईटीसी एज्युकेशन या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. तसेच वरळीतील नॅशनल असोशिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया या संस्थेशी निवड करण्यात आली आहे.

* दिव्यांगांना संकेतस्थळ उपलब्द करून देणाऱ्या [द जळगाव पीपल्स कॉपरेटिव्ह बँक] या बँकेला पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.