सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

भारत अमेरिका संबंध नव्या उंचीवर - २६ डिसेम्बर २०१७

भारत अमेरिका संबंध नव्या उंचीवर - २६ डिसेम्बर २०१७

* अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने केवळ भारताबरोबरील संबंधासाठी १०० वर्षांची योजना आखली असून त्यांनी हा मान आतापर्यंत इतर कोणत्याही देशाला दिलेला नाही.

* यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला जवळचा मित्र बनविण्याचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलले आहेत.

* अमेरिकेकडून भारतासाठी योजना व सवलती

* अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये, भारत हा आघाडीची जागतिक शक्ती असल्याचे मान्य.
* भारत प्रशांत महासागर प्रदेशामध्ये शांतता टिकविण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांनाना समर्थन.
* चीनच्या [वन बेल्ट वन रोड] प्रकल्पाला भारताच्या असलेल्या विरोधाला अमेरिकेचे पाठबळ.
* प्रकल्पाच्या निमित्ताने इतर देशांच्या सार्वभौमत्वाला धक्का बसविण्याचे चीनचे धोरण असल्याचे भारताचे म्हणणे मान्य.
* चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरबाबतच्या भारताच्या विरोधातही साथ.
* सुरक्षा समितीमधील भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.