शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

राज्यातील नागपूर हिवाळी अधिवेशनाची सांगता - २४ डिसेंबर २०१७

राज्यातील नागपूर हिवाळी अधिवेशनाची सांगता - २४ डिसेंबर २०१७

* ११ डिसेंबरपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली असून, या
अधिवेशनात कापूस बोंडअळीचे सावट, धानावरील तुडतुडे व दुष्काळ, समृद्धी महामार्ग यासारखे मुद्दे गाजले. 

* या अधिवेशनात काळात विधानसभेच्या एकूण १० बैठका झाल्या, त्यापैकी ६९ तास ५७ मिनिटे कामकाज झाले. मंत्री उपस्थित नसल्याचे १० मिनिटे व इतर कारणामुळे ४ तास १६ मिनिटे कामकाज वाया गेले. 

* सभागृहाचे रोजचे कामकाज सरासरी ७ तास ४६ मिनिटे झाले. सादर करण्यात आलेल्या ९ हजार २४६ तारांकित प्रश्नांपैकी ६७० प्रश्न स्वीकारण्यात आले. 

* विधानसभेने १९ विधेयके मंजूर केले असून दोन्ही सभागृहांनी ११ विधेयके मंजूर केली. अर्धा तासाच्या ३२० सूचना प्राप्त झाल्या. 

* यानंतर आता विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून मुंबईत होणार आहे. 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.