मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

राज्यातील दुकानांना व आस्थापनांना सात दिवस व्यवसाय करण्यास मंजुरी - २० डिसेंबर २०१७

राज्यातील दुकानांना व आस्थापनांना सात दिवस व्यवसाय करण्यास मंजुरी - २० डिसेंबर २०१७

* राज्यातील दुकानांना व आस्थापनांना सात दिवस व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तिथल्या कामगारांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक आहे.

* महाराष्ट्र दुकान आणि आस्थापना अधिनियम २०१७ कालपासून १९ डिसेंबर संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे.

* शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व मोठ्या व्यवसायांना तसंच आस्थापनांना हा अधिनियम लागू झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक आयटी आणि इतर आस्थापनांना हा अधिनियम लागू होत नाही.

* माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे ऑनलाईन व्यवसाय २४ तास कार्यरत असतात. त्यामुळे ऑफलाईन व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना त्यांच्याशी सकारात्मक स्पर्धा करता यावी म्हणून हा कायदा करण्यात आला.

* या कायद्यात १० पेक्षा कमी कामगार आहेत अशा तसंच लघु आणि छोट्या आस्थापनांना नोंदणी करण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यांनी व्यवसाय सुरु केल्याबद्दल केवळ विहित कागदपत्रासह व्यवसाय सुरु केल्याची ऑनलाईन सूचना द्यावी लागणार आहे .

* दरम्यान या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सुमारे ३५ लाख कामगारांना किमान वेतन तसंच औद्योगिक विवाद अधिनियमाच्या तरतुदी लागू राहतील.

* या अधिनियमांतर्गत महिलांना रोजगार उपलब्द होण्याच्या दृष्टीने त्यांच्या घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत सुरक्षित वाहन व्यवस्था, कामाच्या ठिकाणी त्यांचा योग्य तो मानसन्मान, प्रतिष्ठा आणि सुरक्षितेसोबत पुरेस स्वरंक्षण असेल.

* ओळखपत्र देणं, प्रसाधन गृह, पाळणाघर, उपहारगृह, या सोयी पुरवणं मालकावर बंधनकारक राहील. तसेच राज्यातील दुकाने आणि आस्थापनातील कामगारांना रजेची सवलत पहिल्यांदाच मिळाली आहे. या नियमात ८ कॅज्युअल रजा देणे बंधनकारक राहील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.