शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

जागतिक ब्लिट्झ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला विजेतेपद - ३१ डिसेंबर २०१७

जागतिक ब्लिट्झ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला विजेतेपद - ३१ डिसेंबर २०१७

* भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने जलद प्रकारातील जगजेत्तेनंतर जागतिक ब्लिट्झ स्पर्धेत ब्राँझपदक संपादन केले. याबरोबरच त्याने बुद्धिबळप्रेमींना नववर्षाची आणखी भेट दिली.

* वयाच्या ४८ व्या वर्षी जगजेत्तेपद मिळविल्यानंतर आनंदने ४८ तास उलटण्याच्या आत आणखी एका जागतिक पदकाला गवसणी घातली. विदित गुजराथीची कामगिरीही लक्षवेधी ठरली.

* पारंपरिक प्रकारातील जगजेत्या मॅग्नस कार्लसन याने जलद प्रकारातील निराशेतून सावरत बिल्ट्झमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने १६ गुणांसह निर्विवाद यश मिळविले.

* रशियाचा सर्जी कॅजॅकीन दुसरा आला. आनंदला पहिल्या दिवशी इयन नेपोमियाची यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला.

* नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने १३८ जणांच्या यादीत २२ वे नामांकन प्राप्त केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.