रविवार, ३ डिसेंबर, २०१७

१९ वर्षाखालील विश्वश्वचषक स्पर्धेसाठी पृथ्वी शॉ भारताचा कर्णधार - ४ डिसेंबर २०१७

१९ वर्षाखालील विश्वश्वचषक स्पर्धेसाठी पृथ्वी शॉ भारताचा कर्णधार - ४ डिसेंबर २०१७

* रणजी क्रिकेटमध्ये शतकावर शतके करत असलेल्या मुंबईच्या पृथ्वी शॉची १९ वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. 

* ही स्पर्धा न्यूझीलँडमध्ये १३ जानेवारीपासून सुरु होत आहे. पंजाबचा शुभम गिल उपकर्णधार आहे. पृथ्वी आणि शुभम हे दोघेही नुकत्याच झालेल्या १९ वर्षाखालील आशियाई करंडक स्पर्धेत खेळले नव्हते. 

* आतापर्यंतच्या १९ वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारताने प्रभाव पाडलेला आहे. २०००, २००८, आणि २०१२ मध्ये विजेतेपद मिळवलेले आहे. 

* १९ वर्षाखालील भारताचा संघ - पृथ्वी शॉ [कर्णधार], शुभम गिल [उपकर्णधार], मनजोत कार्ला, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रेयान पराग, आर्यन ज्युएल, हारविक देसाई, कमलेश नागरकोटी, ईशान पोरल, अर्षदिप सिंग, अनुकूल रॉय, शिवा सिंग, पंकज यादव. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.