सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

काही नवीन विशेष चालू घडामोडी - १२ डिसेंबर २०१७

काही नवीन विशेष चालू घडामोडी - १२ डिसेंबर २०१७

* नुकत्याच प्रकाशित UN अस्वच्छ शहर यादीमध्ये प्रथम पाचमध्ये [अल्लाप्पुझा] या शहराचा समावेश करण्यात आला.

* जपानमधील वाको शहरामध्ये खेळण्यात आलेल्या १० व्या आशियाई एअरगन नेमबाजी अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत भारताने एकूण पाच पदकांची कमाई केली आहे.

* युरोपियन युनियन आणि ब्रिटन यांच्यात ब्रिटनमध्ये युरोपियन युनियनमधून कोणत्या अटीवर बाहेर पडायचे ऐतिहासिक करार झाला.

* गेल्या २५ वर्षांपासून रेंगाळलेले आणि राज्यघटनेचे  शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबडेकर यांचे राजधानीतील पहिलेवहिले स्मारक म्हणून ओळखले जात असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र ७ डिसेंबरपासून सुरु होत नाही.

* ८ राज्यामध्ये हिंदू समुदायाला अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना केली असून या समितीत जम्मू काश्मीर, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, आणि लक्षद्वीप या राज्य केंद्रशासित प्रदेशातील लोकसंख्या, स्थिती, त्यासंबंधी अन्य मुद्यांचा अभ्यास करणार आहे.

* जेरुसलेमला इस्त्रायलच्या राजधानीचा दर्जा देण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे.

* सीरियाच्या सीमेजवळील वाळवंटाच्या भागात धडक कारवाई करत अनेक दहशतवाद्यांना खात्मा केल्यानंतर इराकने आयसिस विरुद्धचा लढा यशस्वीपणे संपल्याचे जाहीर केले.

* सलग ३३ वर्षे येमेनवर राज्य करणाऱ्या अली अब्दुल्लाह सालेह यांची ४ डिसेंबर रोजी हौती बंडखोराकडून हत्या करण्यात आली.

* ऑस्ट्रेलियाची संसद ने देशात विवाहासाठी समानता संबंधित विधेयक समंत केले आहे. आता देशातील कोणतीही व्यक्ती कोणाशीही विवाह करू शकतो असा कायदा करणारे ऑस्ट्रेलिया हा २५ वा देश बनला आहे.

*  गोवा सरकारने राज्यातील खाद्यपदार्थ परीक्षणासाठी मोबाईल खाद्य परीक्षण केंद्र चालू केले आहे.

* काचीकुडा रेल्वे स्टेशन भारतातील पहिले १००% अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणारे पहिले स्टेशन बनले आहे.

* केरळ सरकरने नवीन एक अध्यादेश काढून राज्यात दारू पिण्याचे वय आता २१ वर्षावरुन २३ वर्षे केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना दारू पिण्याच्या व्यसनावर प्रतिबंध लागेल.

* २०१७ सालची आशियातील सगळ्यात सेक्सिएस्ट महिला म्हणून प्रियांका चोप्राला मान मिळाला आहे. या वर्षी प्रियांका पहिल्या स्थानी, तर मागच्या वर्षी प्रथम स्थानी असणारी दीपिका यावर्षी तिसऱ्या स्थानावर आहे. आलिया भट्ट चौथ्या स्थानी आहे.

* टाइम्स मॅगझीनने सौदी अरबच्या प्रिन्स मोह्म्मद बिन सलमान यांच्या यांना [पर्सन ऑफ द ईअर] म्हणून घोषित केले आहे.

* तिहेरी तलाक या कायदयाला समर्थन देणारे उत्तर प्रदेश हे देशातले पहिले राज्य बनले.

* फ्रान्सचे प्रसिद्ध रॉकस्टार जॉनी हैलिडे यांचे ७४ व्या वर्षी निधन झाले. ते फ्रेंच देशात फ्रेंच एल्विस म्हणून प्रसिद्ध होते.

* मध्यप्रदेश विधानसभाने राज्यात जर १२ वर्षाखालील मुलीचा बलात्कार किंवा हत्या केली तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात येईल असा कायदा संमत केला आहे.

* येमेनच्या पूर्व राष्ट्रपती असणाऱ्या अब्दुल्ला सालेह यांची त्यांच्याच सहकाऱ्यांनी एक हौटी विद्रोही आंदोलनाच्या दरम्यान हत्या करण्यात आली.

* देशातील ऑनलाईन आहार खाद्य पुरवणारी कंपनी म्हणजे [Swiggy] स्विगीचे नवीन सीईओ म्हणून विशाल भाटिया यांची नियुक्ती करण्यात आले. ही कंपनी व्यक्तीला कुठेही आहार किंवा इतर खाद्यपदार्थ पोहोचवते.

* भारतात ट्विटरवर सगळ्यात जास्त नरेंद्र मोदींचे फॉलोवर्स आहेत. मोदींपाठोपाठ शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, सलमान खान, आणि विराट कोहली ही मंडळी आहे.

* अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अखेर लग्नबंधनात अडकले. त्यांनी इटलीमधील एका रिसॉर्टमध्ये लग्न केले.

* ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारतातील [डीएनए फिंगरप्रिंट] चे जनक डॉ लालजी सिंह वय ७० यांचे हृदयविकाराच्या साहायाने रात्री निधन झाले.

* दक्षिण आफ्रिकेच्या स्वतंत्र चळवळीत मोठी कामगिरी केलेले लालू ईसू छिबा यांचे ८ डिसेंबर रोजी निधन झाले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.