बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

जगातील सर्वात लोकप्रिय जागतिक वारसा स्थळामध्ये ताजमहाल दुसऱ्या स्थानावर - ७ डिसेंबर २०१७

जगातील सर्वात लोकप्रिय जागतिक वारसा स्थळामध्ये ताजमहाल दुसऱ्या स्थानावर - ७ डिसेंबर २०१७

* भारताची ओळख असलेला संगमवरी मकबरा ताजमहाल हे युनेस्कोने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट
जागतिक वारसा स्थळ असल्याचे एका  ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टलच्या अहवालात समोर आले आहे.

* मोगल सम्राट शाहजहान याने त्याची पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. आणि दरवर्षी ८० लाखाहून अधिक पर्यटक भेट देत असलेला ताजमहाल याचे स्थान कंबोडियाच्या अंकोर वॅट मंदिरानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

* देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मते आणि त्यांनी दिलेली क्रमवारी यांच्या आधारे ट्रिप ऍडव्हायजर ने जगभरातून युनेस्कोच्या सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांची यादी प्रसिद्ध केली आहे.

* तसेच या यादीतील सर्वात लोकप्रिय वारसा स्थळामध्ये चीनच्या उत्तरेकडील क्वी राजघराण्याच्या झू डा याने ख्रिस्तपूर्व १३६८ साली बांधलेल्या चीनच्या महाकाय भिंतीचा समावेश आहे.

* दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील माचू पिचूने यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय ब्राझीलमधील इगुअझू राष्ट्रीय उद्यान, इटलीतील सासी ऑप मटेरा पोलंडमधील ऐतिहासिक क्रॅकोओ इस्त्रायलमधील जेरुसलेम हे पुरातन शहर आणि तुर्कस्तानातील इस्तंबूल ऐतिहासिक ठिकाणे यांचाही या यादीत समावेश आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.