सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

काही नवीन चालू घडामोडी - १९ डिसेंबर २०१७

काही नवीन चालू घडामोडी - १९ डिसेंबर २०१७

* जागतिक आरोग्य संघटना [WHO] ने मध्य आफ्रिकेतील गबॉनला पोलिओ मुक्त देश घोषित केले आहे.

* महाराष्ट्र शासनाने राज्यातील [VJ, NT, OBC, SBC] प्रवर्गातील जास्तीत जास्त मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा म्हणून नॉन क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करण्यात आली.

* १३ डिसेंबर २०१७ रोजी अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयरस येथे जागतिक व्यापार संघटना [WTO] ची ११ वी मंत्रीस्तरीय परिषद संपन्न झाली.

* आधुनिक हिंदी साहित्यातील प्रख्यात कथालेखिका ममता कालिया यांना त्यांच्या [दुख्खम-सुख्खम] या कादंबरीसाठी प्रतिष्ठेचा व्यास सम्मान जाहीर झाला आहे.

* डेबिट कार्ड, भीम तसेच युपीआय ऍपद्वारे होणारे २००० रुपयांपर्यंत विनिमय व्यवहारांवर व्यापारी सवलत दर अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट [एमडीआर] न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

*  UIDAI ने एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकेला eKYC प्रक्रिया राबवून सिम कार्ड नोंद, किंवा त्यांच्या एअरटेल बँकेला इत्यादीसाठी प्रतिबंध लागू केला आहे.

* शाहिद कपूर बनला २०१७ चा मोस्ट सेक्सिएस्ट एशियन मॅन साठी सगळ्यात जास्त वोट प्राप्त झाला आहे. मागच्या वर्षी हृतिक रोशन या स्थानी होता.

* जितेश सिंह देव २०१७ चा मिस्टर इंडिया किताब प्राप्त झाला आहे. जितेश आता मिस्टर वर्ल्ड २०१७ साठी भारताचे प्रतिनिधित्व करेल.

* भारतीय गोल्फपटू शुभंकर शर्माने आपला पहिला जॉबर्ग ओपन टूर्नामेंट किताब जिंकला असून हा किताब जिंकणारे ते पाचवे गोल्फपटू ठरले.

* BARC इंडियाच्या अध्यक्षपदी नकुल चोपडा यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सध्याच्या सुधांशु वत्स ची जागा घेतील. त्यांचा कार्यकाळ १ वर्षाचा असेल.

* प्रियांका चोप्राला यावर्षीचा [मदर टेरेसा मेमोरियल सामाजिक न्याय पुरस्कार] प्राप्त झाला असून त्यांना हा पुरस्कार सामाजिक कार्यासाठी केलेल्या कार्याबद्दल देण्यात आला.

* पंजाब सरकारने नायलॉन, प्लॅस्टिक अशा अन्य आरोग्यास घातक पदार्थापासून बनणाऱ्या मांजावर बंदी पूर्णतः आणली आहे.

* केंद्र शासनाने राष्ट्रीय आयुर्वेदिक मिशनला मंजुरी दिली असून ३१ मार्च २०२० पर्यंत या मिशनअंतर्गत २,४०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील. यात प्रमुख्याने आयुर्वेदिक औषधी वाढवणे हे लक्ष असेल.

* चिली देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून सेबेस्टीयन पिनेरा हे निवडणूक जिंकले त्यांना निवडणुकीत ५४.५७% मते मिळाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.