शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

रोनाल्डोला पाचव्यांदा 'बॉलन डीऑर' पुरस्कार - ९ डिसेंबर २०१७

रोनाल्डोला पाचव्यांदा 'बॉलन डीऑर' पुरस्कार - ९ डिसेंबर २०१७

* पोर्तुगाल आणि रेयाल माद्रितचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला पाचव्यांदा प्रतिष्ठेचा 'बॉलन डीऑर' पुरस्कार मिळाला आहे. त्याने हा पुरस्कार पाच वेळा जिंकल्याने लिओनेल मेस्सीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

* रोनाल्डोने सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवताना यंदाही तुल्यबळ प्रतिस्पर्धी मेस्सीला पुन्हा एकदा मागे टाकले. यंदा तिसरा क्रमांक ब्राझीलच्या नेमारने मिळवला.

* ३२ वर्षीय रोनाल्डो गत मोसमात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता. त्याच्या या कामगिरीमुळे रेयालने चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद आपल्याकडे राखले होते. तसेच स्पॅनिशलीगचे विजेतेपद मिळवले होते.

* या पुरस्कारामुळे मी निश्चितच फार आनंदी आहे. अशी कामगिरी आणि असा पुरस्कार प्रत्येक वर्षी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो.

* असे रोनाल्डोने आयफेल टॉवरमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात सांगितले. गतवर्षी रेयाल माद्रीतने मिळवलेल्या विजेतेपदामुळे माझा मार्ग सुकर झाला. असेही तो म्हणाला.

* त्याने यापूर्वी २००८, २०१३, २०१४, २०१६ मध्ये हा पुरस्कार मिळवला आहे. रोनाल्डो या वर्षी फिफा सर्वोत्तम खेळाडूही ठरला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.