शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

मोबाईल इंटरनेट वेगात भारत १०६ व्या क्रमांकावर - ३० डिसेंबर २०१७

मोबाईल इंटरनेट वेगात भारत १०६ व्या क्रमांकावर - ३० डिसेंबर २०१७

* भारतीय इंटरनेट जगात २ जी वरून ४ जी वर पोहोचले आहे. पण आजही मोबाईल इंटरनेटपेक्षा लँडलाईन ब्रॉडबँडचा वेग भारतात अधिक आहे. ओकला या खाजगी संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे.

* २०१७ च्या सुरवातीला भारतातील मोबाईल इंटरनेटचा सरासरी वेग ७.६५ मेगा बाईट प्रति सेकंद [एमबीपीएस] होता. तो वेग या वर्षाच्या अखेरीस ८.८० एमबीपीएसवर आला आहे.

* जानेवारी महिन्यात सरासरी १२.१२ एमबीपीएस असलेला वेग वर्षअखेरीस १८.८२ एमबीपीएस वर गेला. त्यात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ दिसून आली.

* सेवा प्रदाता कुठलेही असले तरी वेगात वाढ होत आहे. ही भारतीय इंटरनेटमध्ये अन्य देश खूप पुढे आहेत. त्यादृष्टीने आता सेवा प्रदाता कंपन्यांनी स्वतःला तयार करण्याची गरज आहे.

* भारतात इंटरनेटचा सरासरी वाढत असला तरी जगाचा विचार केल्यास भारत खूप मागे आहे. मोबाईल इंटरनेट वेगात भारत १०६ व्या क्रमांकावर आहे.

* ब्रॉडबँड इंटरनेटमध्ये भारत ७६ व्या स्थानी आहे. मोबाईल इंटरनेट वेगात नॉर्वे सरासरी ६२.६६ एमबीपीएससह पहिल्या स्थानी आहे. सिंगापूर सरासरी १५३.८५ एमबीपीएस ब्रॉडबँडसह इंटरनेट वेगात जगात अव्वल आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.