रविवार, ३ डिसेंबर, २०१७

सलील पारेख इन्फोसिसचे नवे सीईओ व एमडी पदी नियुक्त - ३ डिसेंबर २०१७

सलील पारेख इन्फोसिसचे नवे सीईओ व एमडी पदी नियुक्त - ३ डिसेंबर २०१७

* माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने सलील एस. पारेख यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी [सीईओ] आणि व्यवस्थापकीय संचालक [एमडी] पदी नियुक्ती केली आहे.

* या नियुक्तीमुळे दोन महिन्यापासून मुख्याधिकारी पदासाठी सुरु असलेला शोध अखेर संपला, पारेख यांची ५ वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली. २ जानेवारीपासून ते पदभार सांभाळतील.

* सध्या पारेख हे मूळची फ्रान्सची असणारी आयटी कंपनी कॅपजेमिनी या कंपनीतून ग्रुप कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.

* त्यांनी अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठातून कम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये मास्टर्स पदवी घेतली आहे.

* त्यांनी मुंबई आयआयटीमधून एरोनॉटिकल इंजिनिअरमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बीटेक चे शिक्षण घेतले आहे.

* कंपनीचे सहसंस्थापक असलेले नंदन निलेकणी हे इन्फोसिसच्या गैर कार्यकारी अध्यक्ष पदावरच कायम राहणार आहेत.

* इन्फोसिस सॉफ्टवेअर एक्स्पोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.

* याच वर्षी ऑगस्ट महिन्यात विशाल सिक्का यांनी एन आर नारायण मुर्तीसह इतर संस्थापक सदस्यांशी मतभेद झाल्यानंतर एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.