गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

आरबीआयचे व्दिमासिक पतधोरण जाहीर - ८ डिसेंबर २०१७

आरबीआयचे व्दिमासिक पतधोरण जाहीर - ८ डिसेंबर २०१७

* रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीने [एमपीसी] व्दिमासिक पतधोरण जाहीर करताना रेपो दरात कोणतेच बदल केलेले नाही.

* रिझर्व्ह बँकेने सकल राष्ट्रीय उत्पादन [जीडीपी] वाढीचा ६.७% हा मागील व्याज दरच कायम ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, आर्थिक वर्ष २०१८ मध्ये देशाचा विकास दर ६.७% टक्कयांनी वाढू शकतो.

* आरबीआयने दुसऱ्या सहामाहीत महागाई दर हा ४.३ ते ४.६% राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. केंद्रीय बँकेच्या एमपीसीने व्दिमासिक समीक्षेत रेपो दर ६% राहिला असे सांगतिले.

* ऑगस्ट महिन्याच्या पतधोरण समितीच्या समीक्षेत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये ०.२५ टक्कयांनी व्याजदरात कपात केली आहे.

* आरबीआयच्या या निर्णयामुळे किरकोळ महागाई दरात वाढ होण्याची शक्यता आहे. हा चालू वर्षासाठीच्या पतधोरणाचा ५ व्दिमासिक आढावा होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.