शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

तोंडी तलाकविरोधी मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - १६ डिसेंबर २०१७

तोंडी तलाकविरोधी मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - १६ डिसेंबर २०१७

* तोंडी तलाक कुप्रथेपासून मुस्लिम महिलांना मुक्ती देणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाचे आज मंजुरी दिली आहे.

* तोंडी तलाक देणाऱ्याला तीन वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद यात असून तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद यात असून हे विधेयक मुस्लिम महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी आहे.

* आता हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी संसदेत सादर केले जाईल. हा कायदा [मुस्लिम विमेन प्रोटेक्शन ऑफ राईट्स मॅरेज बिल २०१७] असा आहे.

* तोंडी तलाक देणाऱ्याला ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्याची आणि महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार देण्याची तरतूद या नव्या विधेयकात आहे. संसदेने या विधेयकावर मंजुरीची मोहोर उठविल्यानंतर तोंडी तलाकची प्रथा अधिकृतपणे बेकायदा होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.