सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

गरिबांसाठी बचतीच्या सरकारी योजना - १९ डिसेंबर २०१७

गरिबांसाठी बचतीच्या सरकारी योजना - १९ डिसेंबर २०१७

* प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना [पीएमएसबीवाय] 

* या योजनेचा वार्षिक प्रीमियम कर वगळता १२ रुपये वार्षिक एवढाच आहे. ही एक शासन पुरस्कृत अपघात विमा योजना आहे जी १८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. 

* अपघाती मृत्यू ओढवल्यास किंवा पूर्णतः अपंगत्व आल्यास नामनिर्देशितीला २ लाख रुपये मिळतील. किंवा अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास नामनिर्देशिला २ लाख रुपये मिळतील. किंवा अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १ लाख रुपये मिळतात. 

* सर्व बँकखाते धारकांना त्यांच्या नेटबँकिंग सेवामार्फत या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेची १ वर्षाची सुरक्षा १ जून ते ३१ मे अशी असेल. 

* प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना 

* या योजनेमध्ये वर्षाला जर ३३० रुपये रक्कम भरली तर त्या रकमेत ग्राहकाला २ लाख रुपयांचा आयुर्विमा मिळतो. दरवर्षी ३३० रुपये किंवा दरमहा २७.५० रुपये एवढा कमी प्रीमियम भरावा लागणार आहे.

* या योजनेसाठी १८ ते ५० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती चालेल. या योजनेचा लाभही नेटबँकिंग मार्फत घेता येऊ शकतो आणि ही रक्कम तुमच्या खात्यातून आपोआप डेबिट होते.

* विमा असलेल्या व्यक्तीचे वय ५५ वर्षे झाले की योजना संपुष्टात येते.

* अटल पेन्शन योजना 

* या योजनेचे लक्ष्य समाजातील आर्थिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या लोकांना त्यांच्या वृध्दापकाळासाठी बचत करण्यास प्रोत्साहन देणे आणि खात्रीशीर दीर्घकालीन पेन्शन मिळवून देणे हे आहे.

* तुम्ही एकदा या योजनेमध्ये गुंतवणूक केलीत की तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षानंतर, तुमच्या योगदानानुसार आणि मुदतीनुसार ठराविक रक्कम पेन्शन म्हणून मिळू लागेल.

* तुम्ही या योजनेमध्ये वयाच्या १८ व्या वर्षीपासून गुंतवणूक सुरुवात करू शकता आणि वयाच्या ६० व्या वर्षीपर्यंत पैसे गुंतवू शकता.

* या योजनेचे मासिक योगदान दरमहा केवळ ४२ रुपये इतकेच देणे आवश्यक आहे. तुम्हाला मुदतीच्या अखेरीस पेन्शनची रक्कम म्हणून रु १००० मिळतील.

* निवडलेल्या योजनेनुसार प्रीमियम क्रमशः वाढत जाईल. या सर्व योजना तुम्हाला कमी किमतीमध्ये तुमचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करतील.

* पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना 

* हा छोट्या बचती करण्यासाठीचा लोकप्रिय गुंतवणूक आणि कर बचतीचा पर्याय आहे. तुम्ही तुमचे पीपीएफ खाते रु १०० च्या किमान गुंतवणुकीसह उघडू शकता.

* आणि दरवर्षी ५०० ते १.५ लाख रुपयांपर्यंत जास्त गुंतवणूक केलीत तर अतिरिक्त गुंतवणुकीवर कोणतेही व्याज मिळणार नाही.

* पीपीएफवरील व्याजदर शासनाद्वारे दर तिमाहीत ठरवला जातो. सध्या पीपीएफचा दर ७.८% निश्चित केलेला आहे.

* जो दरवर्षी चक्रवाढीने गणला जातो. प्राप्तिकराच्या कलम ८०क अंतर्गत पीपीएफमधील १.५ लाखापर्यंत वार्षिक योगदाने कर सवलतीस पात्र असतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.