सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

जानेवारीत दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन - २६ डिसेंबर २०१७

जानेवारीत दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन - २६ डिसेंबर २०१७

* आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षांमध्ये आणखी एका वैशिट्यपूर्ण ठरणार आहेत.

* जगभरातले टॉप सीईओ आणि सत्ताधारी एकत्र येणाऱ्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मोदी सहभागी होणार आहेत. गेल्या २० वर्षामधील या परिषदेत भारतीय पंतप्रधानानीं सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

* या परिषदेत मुख्य पाहुणे म्हणून सन्मान प्राप्त होणारे ते पहिले भारतीय आहेत. दावोसच्या या परिषदेत भारत आणि मोदींचा वरचष्मा राहील. असा अंदाज जगात आहे.

* यात सहभागी होणाऱ्या भारतीय उद्योजकांची संख्या १०० वर असणार आहे. भारताची आर्थिक स्थिती व भारतामधील गुंतवणुकीच्या संधी या विषयाभोवती अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आले आहेत.

* जानेवारी महिन्यात ही परिषद होत असून प्रजासत्ताक दिनही याच महिन्यात असल्याने हा दौरा टाळत आले मात्र २३ ते २६ जानेवारी या काळात ते स्वित्झर्लंड येथील दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये उपस्थतीत राहतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.