बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

केंद्राच्या कार्यालयात मराठी बंधनकारक - ७ डिसेंबर २०१७

केंद्राच्या कार्यालयात मराठी बंधनकारक - ७ डिसेंबर २०१७

* राज्यात मराठी भाषेत मुद्यावर मनसेने आंदोलन तीव्र केलेले असतानाच राज्य सरकारने केंद्र सरकारची कार्यालये, बँका, विमा, कंपन्या, रेल्वेमध्ये इंग्रजी, हिंदीसह मराठी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

* राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने त्या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या लेखी, तोंडी, परीक्षांमध्ये मराठी भाषा व देवनागरीचा वापर बंधनकारक करण्यात आला.

* केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार केंद्र सरकारची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे या कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याचे निदर्शनात आल्याने व राज्यातील अशा कार्यालये वापर बंधनकारक करण्याचा निर्णय सरकाने घेतला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.