शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

जगातील पहिला सौर महामार्ग चीनमध्ये सुरु - ३१ डिसेंबर २०१७

जगातील पहिला सौर महामार्ग चीनमध्ये सुरु - २०१७

* चीनने जगातील पहिला सौर महामार्ग निर्माण केला आहे. १ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग विजेची निर्मिती करणार असून हिवाळ्यात जमा झालेला बर्फ देखील वितळविण्याचे काम यांच्याद्वारे होईल. 

* याशिवाय आगामी काळात हा महामार्ग इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करणार आहे. पूर्व चीनमधील शेनडाँग प्रांताची राजधानी जिनान येथे तयार झालेला हा महामार्ग चाचणीसाठी खुला करण्यात आला आहे. 

* सौर महामार्ग ३ पदरी असून यात ट्रान्ससुलॅन्ट काँक्रीट सिलिकॉन पॅनल्स आणि इन्सुलेशनचे थर बसविण्यात आले आहेत. 

* महामार्गाद्वारे वर्षभरात १० दशलक्ष म्हणजेच १ कोटी किलोवॅट वीज निर्माण करता येईल. हिवाळ्यात जमा झालेला बर्फ वितळावा याकरिता स्नो मोल्टिंग यंत्रणा आणि सौरदीपाना देखील हा महामार्ग ऊर्जा पुरविणार आहे. 

* भविष्यात या महामार्गाद्वारे इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्याची योजना चीनने आखली आहे. याकरता महामार्गाने निर्माण केलेली वीज चार्जिंग स्थानकांना पुरविली जाणार आहे. 

* १ किलोमीटरच्या सौर महामार्गाने ६३२०० चौरस फुटाचे क्षेत्र व्यापले आहे. हा महामार्ग सामान्य महामार्गाच्या तुलनेत १० पट अधिक भर झेलू शकतो. 

* महामार्गाच्या बांधणीसाठी प्रति चौरस मीटर खर्च ४५८ डॉलर्स म्हणजेच जवळपास ३० हजार रुपये एवढा आला आहे. हा सामान्य महामार्गापेक्षा खूप अधिक असल्याचे टोंगजी विद्यापीठातील अभियंता झेंग होंगचाओ यांनी दिली. 

* सौर महामार्गावर जगात फ्रांस, हॉलंड यासारखे देश काम करीत आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.