शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

नेपाळच्या संसदीय आणि प्रांतिक निवडणुकीत डाव्यांची आघाडी - १० डिसेंबर २०१७

नेपाळच्या संसदीय आणि प्रांतिक निवडणुकीत डाव्यांची आघाडी - १० डिसेंबर २०१७

* नेपाळच्या ऐतिहासिक संसदीय आणि प्रांतिक निवडणुकीत डाव्यांची आघाडीने आघाडी घेतली असून नेपाळी काँग्रेसची पीछेहाट झालेली दिसून आली आहे.

* नेपाळच्या संसदीय निवडणुकीत ३० जागेपैकी २७ जागा डाव्या आघाडीने जिंकल्या तर विरोधी पक्ष काँग्रेसला ३ जगावर विजय मिळवला आहे.

* सीपीएन-यूएमएलने १८ जागांवर विजय मिळविला, तर घटक पक्ष सीपीएनने ८ जागांवर विजय मिळविला आहे. त्यात एका अपक्ष उमेदवाराचाही निवडणुकीत विजय झाला आहे.

* राज्य आणि संसदेसाठी २ टप्प्यात २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. नवीन घटना लागू करण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे.

* २०१५ रोजी नेपाळने नवीन घटना स्वीकारल्यानंतर देशात सात राज्यांची निर्मिती झाली होती. मात्र प्रांतवाद आणि अधिकाराच्या झालेल्या हिंसाचारात १२ हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.