शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

देशातील वृद्ध महाराष्ट्रात सर्वाधिक असुरक्षित - २ डिसेंबर २०१७

देशातील वृद्ध महाराष्ट्रात सर्वाधिक असुरक्षित - २ डिसेंबर २०१७

* महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो [एनसीआरबी] यांनी जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

* ३ वर्षांपासून राज्यात या गुन्ह्याचे सर्वाधिक प्रमाण असून हे चिंताजनक बाब आहे. एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात वृद्धांची फसवणूक हत्या असे एकूण २१,४१० गुणेच दाखल झाले आहेत.

* २०१४ च्या तुलनेत हा आकडा २,६९३ ने वाढला आहे. त्यापैकी ४,६९४ गुणेच एकट्या महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ मध्यप्रदेश ३८७७, तामिळनाडू २१२१, राजस्थान २८९५ यांचा क्रमांक लागतो.

* १६९ वृद्धांची हत्या झाली तर ६७ वृद्धांच्या हत्येचा प्रयत्न झाला. ८०० जण फसवणुकीचे बळी पडले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.