गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

विशेष माहिती - बिटकॉइन जगातील आभासी चलन - ८ डिसेंबर २०१७

विशेष माहिती - बिटकॉइन जगातील आभासी चलन - ८ डिसेंबर २०१७

      वॉंन्नाक्रॉय या रॅम्सवेअर मुळे काही महिन्यापूर्वी चर्चेत आलेला बिटकॉइन पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. त्याचे कारण बिटकॉइनने १६ हजार ९०० अमेरिकी डॉलरची उच्चाकी पातळी गाठत आंतरराष्ट्रीय बाजारात धुमाकूळ घातला आहे.  रुपयात एका बिटकॉइनची किंमत सांगितल्यावर तुम्ही देखील बिटकॉइन कडे आकर्षित व्हाल. कारण सध्या एका बिटकॉइनची किंमत आहे १० लाख ९४ हजार रुपये. 
                               बिटकॉइनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरु आहेत की त्यामुळे रिझर्व्ह बँकेने नागरिकांना बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करताना पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे.  बिटकॉइन हे जगातील पहिले अनियंत्रित, आभासी आणि अंकात्मक चलन आहे. जे संपूर्ण जगासाठी खुले आहे. कोणीही ते त्या देशाच्या चलनाच्या साहाय्याने खरेदी करू शकतो. म्हणजेच हे चलन संपूर्ण जगभरात ज्या त्या देशाच्या अधिकृत मान्य असलेल्या चलनामध्ये रूपांतरित करता येते.
                             सध्या सार जग बिटकॉइनचा जनक म्हणून नाकातोंमीला ओळखतात. मात्र हे व्यक्तिमत्व अजूनही जगासमोर आलं नाही.  २००९ मध्ये अस्तित्वात आलेल्या या चलनाचा प्रवास बघण्यासारखा आहे. सात वर्षांपूर्वी ८ रुपयाला एक असा मिळणारा बिटकॉइन आता लाखोंच्या घरात पोहचला आहे.  बिटकॉइनमधील गुंतवणूक म्हणजे एक प्रकारचा सट्टाबाजारच आहे. जे वास्तवात दिसत नाही. मात्र त्याचे मूल्य सतत वाढत आहे. बिटकॉइनचे 'बार्टर' प्रणाली प्रमाणेच कार्य आहे. यातून होणाऱ्या मूल्यनिर्मितीवर कर भरावा लागत नाही.
                     मुळात एका डॉलरला किंवा रुपयाला अमुक इतके बिटकॉइन हे या चलनाच मूल्य अधोरेखित करणारी व्यवस्था कोणती? सारंच गूढ आहे. बिटकॉइनची किंमत कोण नियंत्रित करत? तर माहिती नाही. मग याचे मूल्य ठरते तरी कसे? उदा आपण बातमी वाचतो की पोलिसांनी १० कोटींची ड्रग्स पकडली. मात्र ती बाजारात विकून आपल्याला बाजारातून पैसे मिळतात का? तर नाही. तसेच बिटकॉइनचे आहे त्याचे मूल्य संभाव्यतेवर ठरते.
                   जगाला मर्यादित म्हणजे २.१ कोटी बिटकॉइन उपलब्द आहेत. प्रणालीमध्ये दर १० मिनिटाला १२.५ बिटकॉइन येतात. प्रणालीमध्ये बिटकॉइन येण्याच्या या पद्धतीला मायनिंग असे म्हटले जाते. तर व्यवहार करणाऱ्यांना मायनर्स म्हटले जाते. बऱ्याच देशांनी देखील बिटकॉइनला अधिकृत मान्यता दिली आहे. मुख्यतः जपानने अधिकृत मान्यता दिल्यानंतर बिटकॉइनच्या मूल्यात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट, एक्सपीडीया अशा काही मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देखील बिटकॉइनच्या माध्यमातून व्यवहार सुरु केले आहेत. गेल्या १ ते २ वर्षात बिटकॉइनची लोकप्रियता वाढली असून जगभरातील अनेक वेगवेगळी संकेतस्थळे, काही विमान कंपन्या बिटकॉइन घेऊन ग्राहकांना सेवा पुरवितात. आपल्याला बिटकॉइन खरेदी करता येतात का? तर याच उत्तर हो आहे. मात्र भारताच्या रिझर्व्ह बँकेने बिटकॉइन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता दिली नाही. हे व्यवहार करण्यासाठी कोणतेही नियामक, पूर्वपरवानगी, नोंदणी, अथवा प्रमाणीकरण नाही.
                     सध्या जगभरात बिटकॉइनच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाईन एक्सेंज उघडण्यात आली आहे. तेथे मागणी आणि पुरवठा या तत्वावर बिटकॉइनची किंमत ठरते. या सर्वातून एक वेगळीच अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. सध्या भारतात देखील बिटकॉइनची लोकप्रियता वाढते आहे. भारतात स्वघोषित काही गुंतवणुक तज्ज्ञाकडून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा फुकटचा सल्ला दिला जातो. मात्र त्याला कोणतेही कायदेशीर मान्यता नाही. मात्र एक समांतर चलन म्हणून बिटकॉइनला भारतात पसंती मिळत असल्याने रिझर्व्ह बँकेच्या चिंतेत भर घातली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.