रविवार, ३ डिसेंबर, २०१७

जी-२० राष्ट्रात भारताच्या समावेशामुळे आशियाची प्रगती - ४ डिसेंबर २०१७

जी-२० राष्ट्रात भारताच्या समावेशामुळे आशियाची प्रगती - ४ डिसेंबर २०१७

* भारताचा जी-२० या जगातील सर्वाधिक सक्षम आर्थिक राष्ट्रांच्या गटात झालेला समावेश संपूर्ण आशियाच्या पथ्यावर पडला आहे.

* भारताच्या या प्रवेशानंतर जागतिक थेट विदेशी गुंतवणुकीत एफडीआय आशियाची भागीदारी ७% वाढल्याचे सीआयआयए च्या अहवालात समोर आली आहे.

* भारतीय उद्योग महासंघ अर्थात [सीआयआयए] जागतिक बहुआयामी व्यापारासंबंधी अहवाल अलीकडेच जारी केला आहे.

* त्यामध्ये प्रामुख्याने जी-२० ला घेऊन आशियाई विकास बँक एडीबी, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र यांनी आशियातील देशामध्ये सुरु केलेल्या वित्तीय कामांचा आढावा घेतला.

* या आधी जागतिक एफडीआयमधील आशियाची भागीदारी ४८% होती. आता ती जी-२० भारताच्या समावेशानंतर ही भागीदारी ५५% झाली आहे.

* जगभरात एफडीआयमध्ये ६% घट होत असताना आशियाई देशामधील आंतरप्रदेश एफडीआयमध्ये वाढ होऊन ती २७२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

* मागील ५ वर्षे सरासरी ५५.९ टक्के असणारा आशियातील आंतरप्रदेश एफडीआय वर्षभरात ५७.३ टक्के राहिला आहे. एकूणच जगभरात सर्वत्र मंदीसदृश्य वातावरण आहे.

* तरी आशियाचे जागतिक व्यवसायातील स्थान सातत्याने वाढत आहे. आशियातून बाहेर जाणाऱ्या एफडीआयमध्ये ११% वाढ होऊन ती ४८२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. असे या अहवालातून नमूद करण्यात आले.

* तसेच भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर नावलौकिकाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.