गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याला यादीत स्थान जाहीर - ८ डिसेंबर २०१७

युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याला यादीत स्थान जाहीर - ८ डिसेंबर २०१७

* भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केला.

* तसेच जगातील ११ देशामधील पारंपरिक वाद्य, खेळ, हस्तकलेचा समावेश सांस्कृतिक वारसा यादीत केला आहे.

* देशातील कुंभमेळा पृथ्वीतलावरील सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे. दर तीन वर्षांनी एकदा अशा पद्धतीने बारा वर्षांमध्ये अलाहाबाद प्रयाग, उज्जैन, नाशिक त्र्यंबकेश्वर, हरिद्वार, येथे कुंभमेळा भरतो.

* कोट्यवधी भाविक कुंभमेळ्याला हजेरी लावतात. त्याची दखल युनेस्कोने घेतली आहे. कुंभमेळ्याप्रमाणेच कझाकिस्तानचा पारंपरिक खेळ अस्यक, पोर्तुगालमधील इस्ट्रॅमोज, जर्मनीमधील ऑर्गन हस्तकला आणि संगीत, तर मलावीमधील मातीची भांडी [ज्याला सीमा असे संबोधतात] याचा समावेश झाला आहे.

* [जगातील युनेस्कोने घोषित केलेले सांस्कृतिक वारसा स्थळे]

* किर्गिस्तानमध्ये 'कोकबोरू' हा अश्वस्वारीचा खेळ आहे. इटलीमध्ये 'नेओपोलिटिन' ही कला प्रसिद्ध आहे. याशिवाय इराणमध्ये 'चोगण' हा अश्वस्वारीचा खेळ आहे.

* संगीत वाद्यात अझरबैजानमधील कामांचा व ग्रीसमधील, रेबीटिको, तर आयर्लंडमधील उईलेन हे आहे. याही बाबींनी अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या यादीत स्थान मिळवले आहे.

* दरम्यान, युनेस्कोने जागतिक वारसामध्ये भारतातील कुट्टीयत्तम, संस्कृत थिएटर, वैदिक मंत्रोच्चार परंपरा, रामलीला रामायण कामगिरी, नोवरुझ, नौरौझ, नुरुझ, रम्मन धार्मिक सण आणि गढवाल हिमालयातील विधी थिएटर.

* छाऊ नृत्य, कालबेलिया लोकगीते आणि राजस्थानातील नृत्य, मुडीयेटू विधी थिएटर आणि केरळ नृत्य नाटक, लडाख, जम्मू काश्मीर बौद्ध पठण, संकीर्तन विधी गायन-ड्रमिंग, आणि मणिपूरचे नृत्य आदींचा समावेश केला आहे.

* त्यात आता सिंहस्थ कुंभमेळ्याचा समावेश झाला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.