बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन - १४ डिसेंबर २०१७

प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन - १४ डिसेंबर २०१७

* खिलाडी ४२०, फिर हेरा फेरी या चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, तर विरासत, रंगीला, मन या चित्रपटातून आपल्या दमदार अभियानाने प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकणारे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन झाले.

* ते ५४ वर्षाचे होते. गुजरातमधील भूज येथे १९६३ मध्ये नीरज व्होरा यांचा जन्म झाला. नीरज व्होरा यांना कलेची विरासत वडील पंडित विनायक राय व्होरा यांच्याकडून मिळाली.

* त्यांचे वडील हे प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार होते. नीरज व्होरा यांच्या मातोश्री प्रमिला बेन यांना चित्रपटांची आवड होती. लहानपणी आईसोबत नीरज हे सुद्धा चित्रपट पाहायचे.

* केतन मेहता यांच्या होली या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा अभियानाची संधी मिळाली आणि विनोदाची अचूक टायमिंग साधून प्रेक्षकांना हसवणा कलाकार मिळाला.

* हॅलो ब्रदर, रंगीला, मन, पुकार, बादशहा, सत्या, मस्त, अकेले हम अकेले तुम, दौड, या चित्रपटातून त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.