गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

राष्ट्रकुल २०२२ खेळाचे यजमानपद बर्मिंघमला - २२ डिसेंबर २०१७

राष्ट्रकुल २०२२ खेळाचे यजमानपद बर्मिंघमला - २२ डिसेंबर २०१७

* २०२२ च्या राष्ट्रकुल खेळाचे यजमानपद भूषविण्याचा मान बर्मिंघम शहराला देण्यात आला आहे. बर्मिंघम आणि डर्बन या शहरांनी यासाठी आपला प्रस्ताव सादर केला आहे.

* नंतर आर्थिक अडचणीचे कारण देत डर्बन शहराचे यजमानपद भूषविण्यात नकार दिला. यामुळे राष्ट्रकुल क्रीडा प्राधिकरणाने २०२२ साली होणाऱ्या स्पर्धांच्या यजमानपदाचे हक्क बर्मिंघमला दिले आहेत.

* या स्पर्धेसाठीचा अंदाजे ७५% खर्च हा बर्मिंघम स्थानिक प्रशासनाला करावा लागणार आहे. उर्वरित २५% खर्च हा राष्ट्रकुल समिती करणार आहे.

* याआधी २०१४ साली ग्लासगो आणि त्याआधी २००२ साली मँचेस्टर शहराने राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदाचा मान भूषविला होता. २०१८ साली ऑस्ट्रेलियाचा गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.