रविवार, १० डिसेंबर, २०१७

अहवाल - दरवर्षी एक कोटी नागरिकांचा स्मृतीभंश - ११ डिसेंबर २०१७

अहवाल - दरवर्षी एक कोटी नागरिकांचा स्मृतीभंश - ११ डिसेंबर २०१७

* जगात दरवर्षी एक कोटी नागरिकांना स्मृतीभंश होत असून, त्यातील साठ लाख नागरिक हे कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील आहेत. असा दावा जागतिक संघटनेने केला आहे.

* जागतिक स्तरावर अशा रुग्णांची प्रचंड संख्या असून ही एक धोक्याची घंटा आहे. आणि आम्हाला या समस्येकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

* जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ तेदरोस अधानोम घेब्रेयेयूस यांनी सांगितले. जगात दरवर्षी १ कोटी नागरिकाना स्मृतीभंश होतो.

* आगामी २०५० पर्यंत यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. स्मृतीभ्रंशाच्या आजारावरील उपचारासाठी दरवर्षी ८१८ अब्ज अमेरिकी खर्च होतात.

* या एकूण खर्चामध्ये थेट वैद्यकीय खर्च, सामाजिक आणि अनौपचारिक काळजी यांचा समावेश आहे. २०३० पर्यंत या खर्चात दुपटीहून अधिक वाढ होण्याची शक्यता असून तो दोन ट्रिलियन जाण्याची शक्यता आहे.

* स्मृतिभ्रंशामुळे अनेक रोगही होतात त्यामुळे बुद्धिमत्तेवरही परिणाम होतो. मनुष्याचा दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम होतो. पुरुषापेक्षा महिलांमध्ये त्याचा अधिक प्रभाव असल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.