शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

महाराष्ट्र यावर्षी साखर उत्पादनात भारतात अव्वल - २४ डिसेंबर २०१७

महाराष्ट्र यावर्षी साखर उत्पादनात भारतात अव्वल - २४ डिसेंबर २०१७

* यंदा महाराष्ट्रासह देशातही साखरेचे उत्पादन चांगले झाले. हे उत्पादन देशाला साखरेच्या असलेल्या गरजेइतके आहे. परंतु केंद्र व राज्य शासनाची साखरेच्या आयात व निर्यातीवरील धोरणे यावर भविष्य अवलंबून आहे.

* सन २०१७-२०१८ या वर्षात साखरेचे देशात महाराष्ट्रात सर्वाधिक साखर उत्पादन म्हणजे ३१.३० लाख टन, उत्तरप्रदेश २८.२० लाख टन, कर्नाटक १३.५० लाख टन, गुजरात २.९५ लाख टन, तामिळनाडू ०.९५ टन, तर इतर राज्ये ६.२५ लाख टन उत्पादन झाले.

* अतिरिक्त साखर उत्पादनामुळे पाकिस्तानने स्वतःची साखर निर्यात करण्याचे ठरविले आहे. पाकिस्तानची साखर भारतात आल्यास देशांतर्गत साखरेवर त्याचा निश्चित परिणाम होणार आहे.

* यावर्षी साखरेचे बंपर उत्पादन झाल्याने देशातील साखरेचे भाव कमी झाले आहे. त्यामुळे याचा ग्राहकांना फायदा होऊ शकतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.