मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

राष्ट्रीय आरोग्य अहवाल २०१७ - ६ डिसेंबर २०१७

राष्ट्रीय आरोग्य अहवाल २०१७ - ६ डिसेंबर २०१७

* गेल्या तीन दशकात महाराष्ट्रवासियांचे आयुर्मान जवळपास १० वर्षांनी वाढले असून, नव्वदच्या दशकात सरासरी ५५ इतके असलेले आयुर्मान आता थेट ६५ ते ६९ च्या घरात गेले आहे.

* याच काळात पहिल्या क्रमांकावरील असलेल्या डायरियाचे स्थान ८ व्या क्रमांकावर घसरले असून, प्रीटर्म डिलिव्हरी चे प्रमाण ४% घसरले आहे.

* ही आकडेवारी राज्यासाठी आनंदददायी असली तरीही, पाचव्या स्थानावरील हृदयरोगाने थेट पहिला क्रमांक गाठला आहे. त्यपाठापाठ फुफुसाशी संबंधित रोगांनी ६ वरून दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

* १५ ते ३९ वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच १६.२% मृत्यू हे आत्महत्या आणि हिंसेतून. त्याखालोखाल १३.०% मृत्यू हृदयरोगाने होत असून, रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण १२.३% आहे.

* तर एड्समुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १०.७% व चेतासंस्थेच्या आजाराअंती मृत्यूचे प्रमाण ११% आहे. अकाली मृत्यूत असंसर्गजन्य आजारांचा वाटा ६३.६ टक्के आहे.

* ३६.३% नागरिक विविध आजारांनी ग्रस्त असून, त्यातून ते शारीरिक व वैद्यकीय दृष्ट्या असमर्थ ठरत आहे.

* ज्ञानेंद्रियांच्या आजाराचे प्रमाणही तीन दशकात दुपटीने वाढले आहे. धोकादायक आजारांच्या वर्गवारीत या आजारांनी सोळावरून पाचवा क्रमांक गाठला आहे.

* संसर्गजन्य आजारांचे स्थान असंसर्गजन्य आजारांनी घेतले आहे. असंसर्गजन्य विकारात उच्च रक्तदाब अग्रक्रमावर आहे. त्यानंतर मधुमेह, कोलेस्ट्रॉलचा क्रमांक लागतो.

* भारतात बालमृत्यूचे [पाच वर्षाखालील] प्रमाण ३९.२% असले, तरी हेच प्रमाण महाराष्ट्रात २७.५% इतके मोठे आहे.

* जन्मतः असलेल्या आजारामुळे ४५.४% बालके [० ते १४ वयोगट] मृत्यूमुखी पडत असून पोषण आहाराच्या कमतरतेमुळे १.८% बालकांना आपल्या प्राणाला मुकावे लागणार आहे.

* क्षयरोगाने प्रमाण गेल्या ३० वर्षात मोठ्या संख्येने घटले असून १९९० पर्यंत चौथ्या क्रमांकावर असणारा हा रोग १२ व्या क्रमांकावर आला आहे.

* १९६० ते २०१६ पर्यंत भारतातील विविध राज्यांची आरोग्य परिस्थिती दर्शविणारा आरोग्य अहवाल केंद्र शासनाने नुकताच जाहीर केला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.