गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

रिलायन्सच्या वीजप्रकल्प अदानी ग्रुपने विकत घेतला - २२ डिसेंबर २०१७

रिलायन्सच्या मुंबई क्षेत्राचा वीजप्रकल्प अदानी ग्रुपने विकत घेतला - २२ डिसेंबर २०१७

* कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इंफ्राने कंपनीने आपला वीजप्रकल्प विक्रीत काढला होता. अदानी ग्रुपसोबत १३ हजार २५१ कोटी रुपयाचा सौदा झाल्याची माहिती रिलायन्सने दिली आहे.

* रिलायन्स एनर्जी हा कंपनीचा विद्युत व्यवसाय अदानी ग्रुपच्या ट्रान्समिशन लिमिटेडला विकण्यात आला होता. विजेची निर्मिती कारण्यापासून ट्रान्समीटरपर्यंत सर्व गोष्टीचा समावेश यात होतो.

* १२ हजार कोटी संपत्तीची किमंत असून तर १ हजार १५० कोटी रुपये रेग्युलेटरी अप्रूव्हल देण्यात आले आहे. ५ हजार कोटी रुपयाचं रेग्युलेटरी ऍसेट आणि ५५० कोटी रुपयाच वर्किंग कॅपिटल रिलायन्स इन्फ्राकडेच राहील.

* रिलायन्सच्या एकूण विद्युत व्यवसायासाची किंमत १८ हजार ८०० कोटी रुपयाच्या घरात आहे. या प्रकल्पाच्या विक्रीतून आलेला पैसा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वापरण्यात येईल.

* रिलायन्स एनर्जीचे एकट्या मुंबईत एकूण ३० लाख घरगुती व व्यवसायिक ग्राहक आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.