मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत भारत जगात १०९ व्या स्थानावर - १३ डिसेंबर २०१७

इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत भारत जगात १०९ व्या स्थानावर - १३ डिसेंबर २०१७

* मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत नॉर्वे जगात पहिल्या स्थानावर आहे. तर भारत याबाबतीत जगात १०९ व्या स्थानावर आहे.

* इंटरनेटचा वेग पडताळून त्याबद्दलची आकडेवारी जाहीर करणाऱ्या [ओकला] या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार इंटरनेटच्या वेगाच्या बाबतीत भारताला जगातील पहिल्या १०० देशांच्या यादीतही स्थान मिळालेले नाही.

* जगात नॉर्वेत इंटरनेट स्पीड ६२ mbps, नेदरलँड ५३ mbps, आइसलँड ५२ mbps, आहे. तर २०१७ साली भारतात मोबाईल डाऊनलोडींग स्पीड सरासरी ७ mbps-मेगा बाईट पर सेकंद एवढाच आहे.

* ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत भारत ७६ व्या क्रमांकावर आहे. वर्षभरात भारतातील ब्रॉडबँडचा वेग जवळपास ५० टक्क्यांनी वाढला आहे.

* ब्रॉडबँड इंटरनेटचा विचार केल्यास सिंगापूर जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सिंगापूरमध्ये [१५३mbps] एवढा इंटरनेट स्पीड आहे. व आइसलँड दुसऱ्या तर हॉंगकॉंग तिसऱ्या स्थानावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.