शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

जपानचे सम्राट अकिहितो निवृत्त होणार - २ डिसेंबर २०१७

जपानचे सम्राट अकिहितो निवृत्त होणार - २ डिसेंबर २०१७

* जपानचे सम्राट अकिहितो हे ३० एप्रिल २०१९ ला निवृत्त होतील. अशी घोषणा जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी आज केली. जगातील सर्वात जुने राजघराणे असलेल्या या कुटुंबातील मागील दोनशे वर्षातील ही पहिलीच निवृत्ती आहे.

* अकिहितो यांच्या जागी त्यांचे पुत्र आणि युवराज नारूहितो सम्राटपदावर विराजमान होतील. सम्राट अकिहितो वय ८३ यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

* जपानच्या सम्राटांनी पायउतार होण्याचा इतिहास २६०० वर्षे जुना असला तरीही अखेरच्या सम्राटाने पायउतार होऊन दोनशेहून अधिक वर्षे झाली आहेत.

* अकिहितो हे क्रिसँथेंमम सत्ताधीश असणारे १२५ वे सम्राट आहेत. सूर्यदेवी अमातेरासूंचा पुत्र मानले जाणारे सम्राट जिम्मू हे या सत्तेचे पहिले सम्राट होते.

* अकिहितो यांचे वडील हिरोहितो यांच्या नावाने जपानने विसाव्या शतकात काही युद्धे लढली. त्यांचे १९८९ मध्ये निधन झाल्यानंतर अकिहितो सम्राट झाले.

* १९३३ ला अकिहितो यांचा जन्म झाला. त्यावेळी जपान लष्करीदृष्ट्या प्रबळ होता. आणि संपूर्ण आशियावर हुकूमत निर्माण करण्याची या देशाची क्षमता होती.

* मात्र दुसरे महायुद्ध सुरु होऊन जपानला पराभवाचा सामना करावा लागला या वेळी अकिहितो ११ वर्षाचे होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.