रोनाल्डोला 'ग्लोब सॉकर सर्वोत्तम खेळाडू' पुरस्कार प्रदान - ३० डिसेंबर २०१७
* पोर्तुगाल व रिअल माद्रित क्लबचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या खात्यात आणखी एक पुरस्कार जमा झाला आहे.
* रोनाल्डोला शुक्रवारी 'ग्लोब सॉकर सर्वोत्तम खेळाडू' २०१७ च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. रोनाल्डोने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण ४ थ्या वेळी हा पुरस्कार पटकावला.
* रोनाल्डोने २०११, २०१४ आणि २०१६ व २०१७ साली युरोपियन असोशिएशन फुटबॉल एजंट्स आणि युरोपियन क्लब असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने देण्यात येणारा हा पुरस्कार जिंकला होता.
* यंदाच्या सर्वोत्तम क्लबचा पुरस्कार पुरस्कार रियल माद्रीतने तर सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार झिनेदिन झिदान यांनी पटकावला.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा