रविवार, २४ डिसेंबर, २०१७

जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री - २५ डिसेंबर २०१७

जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री - २५ डिसेंबर २०१७

* हिमाचल प्रदेशच्या पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी भाजपने आज जयराम ठाकूर यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे ५ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले ठाकूर हे आता हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री पदी नाव जाहीर केले आहे.

* ते येत्या २७ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदी शपथ घेतील. हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पक्ष बहुमताने निवडणूक जिंकले.

* जयराम ठाकूर हे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते असून, ते सलग ५ वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले आहे.

* संघ परिवाराशी संबंधित असलेले ठाकूर विद्यार्थिदशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय होते.

* १९९८ मध्ये ते प्रथमच विधानसभेवर निवडून आले. गरीब शेतकरी कुटुंबातील ठाकूर हे कधीही आवाज वाढवून आक्रमकपणे म्हणणे मांडत नाहीत.

* मृदू भाषा बोलणारे व आपले मत मांडणारे जयराम हे सामान्य नागरिकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता हिमाचल प्रदेशच्या विकासासाठी प्रयत्न करावे अशी सामान्य नागरिकांची इच्छा आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.