शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

गेल ठरला टी-२० मध्ये ८०० षटकार ठोकणारा जगातील पहिला फलंदाज - ९ डिसेंबर २०१७

गेल ठरला टी-२० मध्ये ८०० षटकार ठोकणारा जगातील पहिला फलंदाज - ९ डिसेंबर २०१७

* आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल क्रिकेटमध्ये ८०० षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

* विंडीजच्या या डावखुऱ्या फलंदाजाने बांग्लादेश प्रीमिअर लीगमध्ये ढाका येथे खेळल्या गेलेल्या लढतीत रंगपूर रायडर्सतर्फे नाबाद १२६ धावांची खेळी करताना त्याने ही कामगिरी केली.

* गेलच्या नावावर आता ३१८ टी-२० सामन्यात ८०१ षटकार लगावले आहेत. टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत गेलनंतर वेस्ट इंडिजचा किरोन पोलार्ड ५०६ षटकार, न्यूझीलँडचा ब्रॅण्डम मॅक्लम ४०८ षटकार, वेस्ट इंडिजचा स्मिथ ३५१ आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर ३१४ यांचा क्रमांक लागतो.

* गेलने टी-२० मध्ये वैयक्तिक १९ वे शतकही झळकावले आहे. गेलच्या खेळीच्या जोरावर त्यांनी हा सामना जिंकला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.